लोकदर्शन 👉:- मोहन भारती
गडचांदूर येथील नगर परिषद च्या भोंगळ कारभार मुळे येथील जनता होरपळून निघाली असल्याने जनतेत तीव्र रोष आहे.कोविड मुळे अगोदरच आर्थिक तंगीत असतांना न प ने अतिरिक्त दोन टक्के दंड लावण्याचा निर्णय घेतला व न प च्या प्रशासना कडून सक्तीने वसूल करण्याचा तगादा लावण्यात आला ते पूर्णपणे चुकीचे असून सदरचा दंड रद्द करण्याबाबत तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थाना उर्वरित अनुदान देण्यात यावे या मागणी साठी मागील दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा करण्यात आला 13 एप्रिल ला धडक मोर्चा काढण्यात आला.परंतु सत्ताधारीपक्ष कुठलीही दखल घेण्यास तयार नसल्याने शेवटी भारतीय जनता पार्टी च्या वतीने दिनांक 18 मे ला ठिय्या आंदोलन करण्यात आले.तरीपण निर्दयी सत्ताधारीपक्षाने य कुठलीही दखल घेतली नसल्याने दिनांक 19 मे पासून प्रशांत खाडे व बबलू रासेकर यांनी बेमुदत उपोषण बसण्याचा निर्णय घेतला व जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे मत व्यक्त केले.
भाजपचे कार्यकर्ते बबलू रासेकर व प्रशांत खाडे हे बेमुदत उपोषणाला बसले असून त्यांना अनेक महिला पुरुषांनी पाठिंबा देण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे मुख्याधिकारी व सत्ताधारी पक्षाचे बांधकाम सभापती अरविंद मेश्राम यांनी सदर मागण्या रास्त असून लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले आहे
बेमुदत उपोषण सुरू करतांना महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व उपोषण कर्ते बबलू रासेकर व भाजपचे दलित आघाडी प्रमुख प्रशांत खाडे यांना हार घालून शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी भाजप चे जेष्ठ नेते महेश शर्मा, महादेवराव एकरे,निलेश ताजने, संदीप शेरकी, आदि उपस्थित होते.
,,