सद्गुणांची संगंत केल्याने मानव जीवनाचे सार्थक होते. — प्रबोधनकार अशोक परब.

.
लोकदर्शन 👉 मोहन भारती


प्रवचन सोहळ्याचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते उद्घाटन.

राजुरा :– परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कळमनाचे सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रबोधनकार अशोक परब महाराज पनवेल, मुंबई यांनी माणसांमध्ये असलेल्या रजोगुण लक्षण या विषयावर मार्गदर्शन केले, माणसाने गूणाकडून सत्वगुणाकडे गेले पाहिजे. योग्य जीवन शैली आचरणात आणून नित्य नेमाने सद्गुणांची संगत केली पाहिजे. यामुळे मानव जन्माचे सार्थक होते असे मत व्यक्त केले. या प्रसंगी सरपंच वाढई यांनी सांगितले की, खरा माणूस तयार होण्यासाठी गावागावात सत्संग, प्रवचनाचे आयोजन झाले पाहिजेत. यामुळे समाजाला एक नवीन दिशा मिळून उत्तम माणूस, उत्तम समाज निर्माण होण्यास मदत होते.
या प्रसंगी प्रा. लढी, किशोर पिंपळकर, धनवलकर सर, नंदू पाटील पिंपळकर, कवळू पाटील सातपुते, कळमना सेवा केंद्राचे अरुण आस्वले, देविदास उमाटे, कवडू पाटील पिंगे, उद्धव पाटील आस्वले, अशोक पाटील कावडे, सुभाष वाढई, शंकर ताजणे, गुरुदेव सेवा भजन मंडळाचे दत्तू पाटील पिंपळशेंडे, महादेव ताजने, विठ्ठल वाढई, महादेव पाटील पिंगे, नानाजी पाटील आंबीलढगले, शंकर गेडाम, लटारी गौरकर, सुरेश आत्राम, भाऊराव कावळे, पुंडलिक पिंगे तसेच राजुरा, गोवरी, चिंचोली, खामोना, चंदनवाई, कळमना या सर्व सेवा केंद्रातील भाविक भक्तगण व नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *