लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
– जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथून भोयगाव – अंतरगाव मार्गे कोरपना बस फेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे. भोयगाव येथून जोडणारा हा मार्ग कोरपना व चंद्रपूर तालुक्यातील नागरिकांसाठी प्रवासासाठी अत्यंत कमी अंतर व जवळचा आहे. त्यामुळे या मार्गे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. अनेक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी या रस्त्याने नियमित अपडाऊन करतात. तसेच नारंडा येथील दालमिया सिमेंट उद्योग , विरुर येथील वेकोलिची कोळसा खान, विदर्भातील सर्वात मोठे होमियोपॅथीक रुग्णालय , जिनींग प्रेसींग उद्योग याच मार्गावर स्थित आहे. मात्र या मार्गावर चंद्रपूर ते कोरपना दरम्यान एकही थेट बस सेवा नाही. त्यामुळे येथून जाणार जाणाऱ्या – येणाऱ्यांना प्रवास करण्यात अडचण येत आहे. या मार्गावर नियमित सकाळी आठ , दहा , दुपारी बारा , तीन , पाच सायंकाळी सहा वाजता कोरपना व चंद्रपूर या दोन्ही ठिकाणावरून बस सेवा सुरू केल्यास सोयीचे होईल. याचा फायदा या मार्गावरील वनसडी, पारंबा, नारडा, शिवनारडा, नवेगाव , कढोली, वनोजा ,झोटींग, कळमना, परमडोह, पाथरी, अंतरगाव, सांगोडा , कारवाही , सोणूर्ली, गाडेगावं, विरूर , खैरगाव, इरई, एकोडी, भोयगाव, धानोरा, पिपरी, देवाडा, दाताळा , एमआयडीसी, पडोली, रामनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी परिसरातील नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने होईल. त्यामुळे ही बस सेवा सुरू करणे नितांत गरजेची आहे. या मार्गावर वनसडी ते चंद्रपूर दरम्यान एकही खासगी प्रवास वाहन चालत नाही. त्या कारणाने प्रवाशांची चांगलीच पंचाईत होते.