लोकदर्शन 👉 राहुल खरात
कार्यक्रम स्वागत प्रास्ताविक उत्तमरित्या प्रभावीपणे भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा कोषाध्यक्ष आयु. संजयजी कांबळे गुरुजी यांनी केले. तसेच उत्तमरित्या सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा संस्कार विभाग सचिव आयु. सुजितजी कांबळे गुरुजी यांनी संपन्न केले.महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध आणि महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र मुर्तींना पुष्फ सांगली जिल्हा भारतीय बौद्ध महासभा सन्माननीय अध्यक्ष आयु. रुपेशजी तामगांवकर साहेब यांनी वाहिले. तसेच बुद्ध विहारा करिता तसेच आद.प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय व सामाजिक चळवळीसाठी स्वतःच्या मालकीची जागा दान करणारे, दानदाते कालकथीत सुधाकर बलखंडे आबा यांची जेष्ठ मुलगी माजी सभापती नगरसेविका भारतीताई भगत यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले. उपस्थित बौद्ध उपासिका यांनी सुगंधीत अगरबत्ती लावली व सुवासिक फुले वाहिली.बुद्धांच्या जीवन चरित्र्यावर आधारित बौद्ध बालिका यांनी मधुर आवाजात गिते गायली.तसेच बुद्धांचे तत्वज्ञान जगाला तारणारे आहेत,जगात शांती निर्माण करणारे आहेत, जगाला शांतीची गरज आहे, बुद्धांनी सर्वांनाच जवळ केले, लोकांचे दुःख दूर करण्यासाठी पायी पायी 45 वर्षे ज्ञान उपदेश देत फिरले, वैशाख पौर्णिमेला निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा जन्म राणी महामाया यांच्या पोटी झाला होता, राजाचा मुलगा असूनही त्यांनी राज्यकारभार न करता, मानवाच्या हितासाठी मार्ग काढण्यासाठी गृहत्याग केला अशा आशयाचे विचार बौद्धाचार्य आयु. सुजितजी कांबळे कार्यक्रम प्रसंगी प्रवचन करत व्यक्त केले यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पदाधिकारी आयु. नितीन सरोदे गुरुजी, आयु. विशाल कांबळे सर, आयु. सहदेव कांबळे सर, वंचित बहुज आघाडी प्रणित अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष आयु.संजयजी कांबळे, मुकेश सरोदे, सहदेव कांबळे सुधाकर कोरे प्रा.अंभोरे, विहाराचे अध्यक्ष विद्याधर बलखंडे, यशोदामाई बलखंडे,बलखंडे आबा यांच्या परिवारातील नातेवाईक, बौद्ध उपासिका, उपासक, बौद्ध बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शेवटी सरनत्तय गाथा घेऊन कार्यक्रम सांगता झाली, सर्वांना गोड मिटाई वाटप करण्यात आली. तसेच वंचित बहुजन आघाडी प्रणित अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हा मार्फत भोजनदान देण्यात आले.मोठ्या आनंदाने व उत्साहाने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.