लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बुद्ध विहार सुशोभीकरणासाठी १५ लक्ष रूपये देण्याची घोषणा.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर–
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथे पुर्णत्वास आलेल्या सिद्धार्थ बुद्ध विहार चे लोकार्पण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर बुद्ध विहारासाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मागील कारकीर्दीत १० लक्ष रुपये निधी मंजूर केला होता तसेच लोकसहभागातून काही निधी उपलब्ध करून या विहाराचे काम पूर्ण करण्यात आले. या बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी पून्हा १५ लक्ष रूपये निधी देण्याचे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, बुद्ध पौर्णिमा प्रत्येक बौद्ध बांधवांसाठी अविस्मरणीय दिवस आहे. कारण याच दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वान या तीनही घटना झाल्या आहेत. तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा मार्ग दाखविला, ‘अथ् दिप भव्’ म्हणत मानवाला प्रगतीचा मार्ग मोकळा केला. बुद्धांचे मानवतावादी आणि विज्ञानवादी विचार जगाचा उद्धार करणारे आहेत. आज सर्वत्र युध्द सदृश्य आणि भयावह परिस्थिती लक्षात घेता जगाला पून्हा एकदा बुद्धांच्या विचारांची गरज आहे हे सिद्ध होते. प्रत्येकांनी त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन प्रगती करावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी पंचशील बौद्ध मंडळ आवाळपूर चे अध्यक्ष सिद्धार्थ वानखेडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून टी एम साव, जी के उपरे, संघा साव, प्रमुख पाहुणे गौतम धोटे,राहुल बोढे, प्रा. आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, मन्ना माशिरकर, अभय मुनोत, हारून सिद्दिकी, ग्रा. प सदस्य कल्पतरू कन्नाके, एकता वानखेडे, स्वाती नगराळे, कोट्टे, मोहुर्ले, चेतन उंदीरवाडे, किशोर साबणे, निरंजन जामगडे, चंद्रमणी धोटे, सत्यवान दिवे, योगेश काटकर, बंडू निरांजने, योगेश नगराळे, भाऊराव पाटील, भालुदास मडावी, ईश्वर मोहुर्ले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंदा डंभारे केले. प्रास्ताविक मिना धोटे यांनी तर आभार प्रदर्शन के. सी. वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला आवाळपूर वासिय नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थीत होते.
,