भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र* *विदर्भ विभाग नागपूर जिल्हा* *गरजूंना एक हात मदतीचा.   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

  • नागपूग्रामीण अंतर्गत बेसा- बेलतरोडी येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा गरजू लोकांना मदत व्हावी या उदार भावनेतून आज दिनांक 16/05/2022 सोमवार ला भटके विमुक्त हक्क परिषद विदर्भ विभाग नागपूर जिल्हा चा वतीने काही मदतीचा हात पुढे करत गरजूंना साडी, टॉवेल, शर्ट पिस,कपडे, बिस्कीट, पाणी बॉटल्स, इत्यादी वस्तू व धान्य वाटप करण्यात आले भटके विमुक्त हक्क परिषद नागपूर जिल्हा पदाधिकारी व संघटक तसेच स्थानिक बांधवांनी व इतर मान्यवर व्यक्तीनी गरजूंना मदत केली. तेथील सत्य परिस्तिथी बघता भयावह परिस्थिती लक्षात आली भर उन्हात एवढा संसार उध्वस्त होऊन घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नाही ती पाहून अश्रू अनावर झाले एवढीच अपेक्षा शासन राज्यकर्त्यांना आहे की त्यांनी तात्काळ मदत करावी प्रसंगी उपस्थित महेश गिरी (विदर्भ अध्यक्ष),प्रविण पाचगे( उपाध्यक्ष नागपूर),गोवर्धन बडगे ( उपाध्यक्ष नागपूर), शंकरजी काळे (ज्येष्ठ मार्गदर्शक), नितेश पूरी ( भंडारा जिल्हा अध्यक्ष), विजय आगरकर (सचिव नागपूर),अंकित पवार ( संघटक नागपूर), अशोक बागुल, अतुल भिसे, लोकेश पवार, मयूर जूनघरे, अविनाश पंचबुढे, अमिता उर्कुदे, सविता मेश्राम, पदमाताई पवार,अमोल राठोड , इतर समस्त भटके विमुक्त हक्क परिषद परिवार यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *