लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 महादेव गिरी
सेलु तालुक्यातील वालुर पौराणिक द्दष्टीने ऐतिहासिक आहे. येथेy वाल्मिक ऋषी यांचे प्राचीन मंदिर असुन अनेक ऐतिहासिक बारव आहेत. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने बारवा मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.परंतु वालुर येथील युवा वर्गाने एकजुट होऊन वालुर येथे असलेले ऐतिहासिक बारव यांची स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरवले.सरपंच संजय साडेगावकर,सेलु उपविभागीय अधिकारीअरूणा संगेवार,औरंगाबाद येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे,शैलेश तोष्णीवाल, राजेश साडेगावकर यांच्यापुढाकारातून सर्व ग्रामस्थ यांनी एकत्र येवूनप्राचीन वारसा असलेले ऐतिहासिक बारव यांची स्वच्छता मोहीम दि.15 मे रविवार रोजी प्रारंभ करण्यात आला असून स्वच्छतेचे कार्य सुरू ठेवुन ऐतिहासिक महत्त्व असलेले पुरातन ठेवा जपण्याचा संकल्प युवा वर्गाने केला आहे.भगवान दराडे, दत्ता राख, तुकाराम ईंगोले,गजानन देशमाने, वाल्मिक दराडे,भास्कर लांडे,विष्णू दराडे,नागेश दराडे, रामु धापसे, रावसाहेब दराडे,अनिल टेकिळे,ऋषिकेश राख, कुलदिप राख, परमेश्वर राख,वाल्मिक मुंढे, तुकाराम मुंढे, बाजीराव बोडखे, बबन बोडखे, गणेशराव बोडखे, श्रीहरि अबुज,मामा जवळकर आदी युवक परीश्रम घेत आहेत.