अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर गुन्हा दाखल करा ,,,कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करून त्याचा अपमान केला. सोबतच तुकाराम महाराजांचा सुध्दा अपमान केला आहे. यापुढे पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता अभिनेत्री चे फेस बुक पेज , ट्विटर,इंस्टाग्राम,कायमस्वरूपी ब्लॉक करावे, तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना देण्यात आले ल्या निवेदनात केली आहेत, निवेदन सादर करण्यात आले त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजुरा विधानसभा प्रमुख माजी जिल्हा परिषदेचे सभापती अरुण निमजे,तालुका अध्यक्ष नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, जिल्हा उपाध्यक्ष रफिक निजामी,गडचांदूर शहर महिला अध्यक्ष नगरसेविका अश्विनी कांबळे,नगरसेविका मिनाक एकरे,प्रवीण मेश्राम,सुनील अरकीलवार,निलेश गोरे,करणसिंग, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *