लोकदर्शन 👉 राहूल खरात
सासवड, दि. १५- पुरंदर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने देि १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात गाजत असलेल्या माझ्या वारीच्या वाटेवर ऐतिहासिक महा कादंबरीला राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, बालुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्री स्मिता मालकर, युवा नेते गौरव कोलते,सुनील तात्या धीवार, दत्तात्रय कड, संदीप बनकर, शरद यादव उपस्थित होते. माळशिरस भुलेश्वर येथे महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवशाहीर राजेंद्र खुडुस्कर, सरपंच महादेव बोरावके, प्रशांत पवार, विनोद जगताप, दुर्गा उरसळ, अरविंद जगताप, राहुल यादव, आदी उपस्थित होते. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठोबा आणि वारकरी संप्रदाय यावर संशोधन करून लिहिलेली वारीच्या वाटेवर ऐतिहासिक महा कादंबरी म्हणजे वारकरी संप्रदाय ची बखर आहे. वारकरी संताना अभिप्रेत असणारा प्रबोधनाचा विचार केंद्रस्थानी ठेवून वारकरी संप्रदाय चा वैभवी इतिहास कादंबरीत वाचायला मिळतो. घराघरात ठेवावी अशी कलाकृती निर्माण होणे ही आजची खरी गरज आहे असे श्री शिंदे यांनी सांगितले.