By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह.साळुंखे यांचे जीवन आणि भूमिका स्पष्ट करणारे प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड लिखित ” सत्य असत्यशी मन केले ग्वाही” ( आ. ह.साळुंखे: जीवन आणि भूमिका) हा चरित्रग्रंथ बुद्ध जयंती दिनी १६ मे २०२२ रोजी प्रकाशित होत आहे.आधुनिक भारताच्या जडण घडणीत डॉ.साळुंखे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.ते योगदान अधोरेखित करणारे आणि सर्वांनी आर्वजून वाचावे असे हे चरित्र आहे.डॉ साळुंखे यांचे जीवन नेमके कसे आहे.त्यांनी लेखन करताना कोणती पथ्ये पाळली.कोणाकडून प्रेरणा घेतली.त्यांचे सहजीवन नेमके कसे होते.त्यांनी आयुष्यभर घेतलेली भूमिका जगण्याला कसे नवे परिमाण देते.या सर्वांचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे डॉ.साळुंखे यांचे जीवन आहे. वैचारिक प्रदूषण आणि त्या निमित्ताने निर्माण झालेले आणि होऊ पाहणारे प्रश्न कसे समजून घ्यावेत,सामाजिक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते कसे असावेत.त्यांनी समन्वय साधून कोणती भूमिका घ्यावी.महापुरुषांना कसे समजून घ्यावे, बौद्धिक युक्तिवाद कसे करावेत यासाठी डॉ साळुंखे यांनी मोठी वैचारिक रसद पुरविली आहे.अशा अनेक बाबींचा परामर्श घेणारे हे चरित्र आहे.ते केवळ तरुणांनाच नव्हे तर माणूस म्हणून उन्नत होहू इच्छिणाऱ्या सर्वानाच प्रेरणादायी आहे.
प्रकाशक मा.राकेश साळुंखे,लोकायत प्रकाशन, मो 8484977899
लेखक डॉ प्रशांत गायकवाड, मो.9822438743
पृष्ठे ६३०
किमात ३३०, रुपये.
सवलतीच्या दरात रुपये 300