लोकदर्शन 👉 राहुल खरात
पुणे/भोर- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या वतीने दि.15 मे 2022 रोजी सकाळी 7 वाजता भोर येथील राजवाडा मध्ये महात्मा फुले यांच्या जीवनावरील सत्यशोधक चित्रपटाचे गेली 7 दिवस शुटिंग चालू होते त्याच्या समारोप दिवसाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व ऍड अरुण धुमाळ यांचे हस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सत्याचा अखंड ढोक यांनी गायला तर ऍड.धुमाळ यांनी नारळ फोडून आजच्या शूटिंगला शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रपट निर्माते आप्पा बोराटे, प्रवीण तायडे, राहुल वानखेडे,लेखक निलेश जलमकर तर महात्मा फुले यांचे भूमिकेत संदीप कुलकर्णी तर सावित्रीबाई च्या भुमिकेत राजश्री देशपांडे आणि 100 कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत उपस्थित होते. यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की आजच्या काळात वाचन संस्कृती लुप्त होऊ लागल्याने महात्मा फुले यांनी फहक्त शाळा सुरू त्याव्यतिरिक्त फुले दांपत्य यांचे अनेक संघर्षमय जीवन कार्य सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना व युवा पिढीला कळणार आहे. त्यामुळे सामाजिक कार्याचा समतोल
तर राखण्यासाठी उपयोग होईलच सोबत चित्रपट पाहून होणाऱ्या प्रबोधनामुळे त्यांचे आचार विचार देखील मना मनात रुजतील याची खात्री वाटते .तसेच प्रत्यक्ष चित्रपटातील काही प्रसंगात स्वतः व जोडीदार युवराज सावंत यांनी सहभाग घेऊन किती कठीण काम असते याचा अनुभव देखील घेतला .तर लवकरच 28 नोव्हेंबर 22 रोजी समतादिनी हा सत्यशोधक चित्रपट तयार होऊन सर्वाना बघायला मिळो अशा सर्वाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आप्पा बोराटे, प्रवीण तायडे,राहुल वानखेडे,आणि निलेश जलमकर यांनी देखील महात्मा फुले यांचे कार्य मर्यादित नसून आजच्या विज्ञानयुगात देखील सर्व सुविधा उपलब्ध असताना देखील 18 व्या शतकात फुले दांपत्य यांनी केलेले अलौकिक कार्य आज देखील 150 वर्षानंतरही करणे किती अवघड आहे हे प्रत्यक्ष आपण जाणतो आहोत.तो खरा इतिहास येणाऱ्या पिढीला कळावा व सत्यशोधक चित्रपटातून बोध घेऊन महापुरुषांचे विचार आचरणात आणून चांगला समाज घडावा या हेतूने आम्ही चित्रपट बनवित आहे ,30 टक्के काम बाकी आहे.रघुनाथ ढोक हे सत्यशोधक विवाहाचे माध्यमातून एक कार्य पुढे नेत असले तरीही त्यांचे अनेक कार्य देशाला दिशा देणारे असल्याचे सांगून सर्वांनीच आवर्जून हा सत्यशोधक चित्रपट सिनेमा गृहात बघावा असे आवाहन देखील यावेळी केले. कार्यक्रमाचे शेवटी आभार शिवा बागुल यांनी मानले आणि संस्थेतर्फे कलाकार ,निर्माते यांना महात्मा फुले गीत चरीत्र, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,सत्यशोधक विवाह विधी ग्रंथ भेट दिले तर मोलाचे सहकार्य आकाश ढोक यांनी केले.