मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महाआरोग्य शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद.


लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 15 एप्रिल मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर रविवार दिनांक 15/5/2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत उरण नगरपरिषद शाळा , पेन्शनस पार्क , एनएमएमटी बस स्टँड च्या समोर उरण शहर येथे आयोजित करण्यात आले होते. या महा आरोग्य शिबिराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

सदर आरोग्य शिबिरात जनरल तपासणी , दंत तपासणी,डोळे तपासणी ,रक्तदाब तपासणी,हाडांचे आजार तपासणी,मधुमेह रक्त तपासणी,स्त्रीरोग तपासणी , ई . सी. जी आदी तपासण्या मोफत करण्यात आले .तसेच ठराविक चष्म्यावर 50% सवलत देण्यात आली. उरण तालुक्यातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.यावेळी उरण मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संग्राम तोगरे यांनी गोळ्या औषधे मोफत दान दिली.

आमदार महेशशेठ बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे उद्घाटन नगरसेवक तथा भाजपा तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी केले. यावेळी नगरसेवक कौशिक शेठ शहा , माजी नगराध्यक्ष सायली ताई म्हात्रे, एमजीएम मधील डॉक्टर सुभाष जाधव आणि त्यांची टीम,मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजय पाटेकर आणि त्यांचे सभासद – बादल म्हात्रे , सनी पाटील, विकास पाटेकर , प्रणय अमृते, किशोर पाटेकर ,गणेश पाटेकर , गिरीष पाटेकर ,शलाका पाटेकर , पुनम पाटेकर , जोस्त्ना पाटेकर , सायली पाटेकर , कल्पिता पाटेकर, शौनक समेळ, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्ते सुमेध पाटील , योगराज करंगुटकर , मधुरा करंगुटकर , प्रेरणा पाटील , कौस्तुभ कोंडीलकर आदींनी विशेष मेहनत घेतली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *