लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर :–
कोरपना तालुक्यातील मौजा बाखर्डी येथे दिनांक ४ मे २०२२ ते २२ मे २०२२ पर्यंत सर्वांगीण बाल सु संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन शिबीरार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे या मुलांवर उत्तम संस्कार रूजवने आवश्यक आहे. त्यादृष्टीने बाखर्डी येथील हे बाल सु संस्कार शिबिर निश्चितपणे उल्लेखनीय आहे. बाल शिबिरातून मुलांमध्ये सुसंस्कारांचे बिजारोपन होण्यास मदत होते. अशा उत्तम संस्कारी पिढीमुळेच पुढे देशाचे नाव मोठे होते.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, किन्नाके महाराज, गोहोकर महाराज, चौधरी महाराज, रामदास ताविडे, संतोष एकलारे, मारोती पानघाटे, संदीप गुरुनुले, आकाश ताविडे, विशाल टिकले, भोजराज परसुटकर, दिक्षांत पायपरे यासह अनेक मान्यवर, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
संचालन आकाश तावडे, प्रस्तावित गोहोकार महाराज यांनी तर आभार चौधरी महाराज यांनी केले.
,,