लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपणा तालुक्यातील अनेक नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली आहे. प्रत्येक तालुक्यातील शेतकरी बांधवाकडून पीक कर्ज देतांना संबंधित बँकेनी किंवा सोसायटीने दरवर्षीच पीक विम्याचे पैसे कपात केले आहे. मग कपात केलेले पैसे आजही विमा कम्पनिकडे जमा आहेत. परंतु कित्येक वेळा ओला किंवा सुका दुष्काळ पडला असतांना सुद्धा आतापर्यंत पीक विम्याचे पैसे एकही शेतकऱ्याला देण्यात आलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. जर शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नसेल तर पीक कर्ज घेतांना शेतकऱ्यांकडून कपात करण्यात आलेली विम्याची इतक्या वर्षाची रक्कम तरी शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी परत करावे अशीही मागणी भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केली