लोकदर्शन👉 मोहन भारती
♦️आमदार सुभाष धोटे यांचे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश.
राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह राजुरा येथे वेकोली आणि कोल वाॅशरिज च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन क्षेत्रात वेकोली आणि कोल वाॅशरिज मुळे निर्माण समस्या आणि त्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. आमदार सुभाष धोटे म्हणाले की वेकोली आणि कोल वाॅशरिज ने स्थानिक परिसरात कोळस्याची ओव्हरलोड वाहतूक होणार नाही याची खबरदारी घेणे, कोल वाॅशरीजमुळे होणारे धुळ प्रदुषण नियंत्रण करणे, धुळ प्रदुषण व अनियंत्रित कोळसा वाहतूकितून होणारे अपघात, रस्ते अपघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य आणि जीवीताच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन काम करावे अशा सुचना केल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, राजुरा तहसिल चे अतुल गांगुर्डे, कोल वाॅशरिज चे बी. एस. गायकवाड, पी. के. वर्मा, व्हि व्हि डाळ, पांढरपौणी चे तलाठी पि. बी. शेख, अहेरी चे तलाठी एस. जी चिडे यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.