“बार्टी” मध्ये स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन (Stipend) प्रत्येक महिन्याला वेळेवर द्या तसेच महागाई निर्देशांक नुसार येत्या वर्षापासून विद्यावेतनात वाढ करा…* *वंचित बहुजन आघाडीची मागणी…

 

लोकदर्शन सांगली 👉राहूल खरात
दि. १४ मे २०२२

वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सांगली यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे,
मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी प्रशासनातील मोठमोठ्या पदावर विराजमान व्हावेत या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (BARTI) मार्फत बँकिंग/ रेल्वे/LIC/SSC इ. अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते हा उपक्रम स्तुत्य आहे. आज ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना अश्या प्रशिक्षणाची गरज आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये ६ महिने मोफत प्रशिक्षण व ६००० प्रति महिना विद्यावेतन विद्यार्थ्यांना देण्यात येते. परंतु प्रशिक्षण सुरू झाल्या पासून आज अखेर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी एकही महिन्याच विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळाले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाना तोड द्यावे लागत आहे. दिवसेदिवस वाढत जाणारी महागाई, पेट्रोल डिझेल च्या किमतीत झालेली बेसुमार वाढ, ग्रामीण भागातून प्रशिक्षण ठिकाणी जायचे असल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसने यावे लागते परंतु बस वाहतूक बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कळित झाली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना दुप्पट तिप्पट पैसे देऊन प्रशिक्षण क्लास ला पोहचावे लागत. जर शहरात राहायचं म्हटले तरी रूमचे भाडे, जेवणाचे पैसे हे संपूर्णत महाग झाले आहे त्यामुळे बरेचसे विद्यार्थी गावी परतण्याच्या मार्गावर आहेत. सरकारी कर्मचारी, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांना एक महिन्याच्या वेतन मिळाले नाही तर त्यांची संपुर्णत एक महिन्याचे बजेट बिघडते तर आताच स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करत असलेल्या विद्यार्थ्याने त्याचा मासिक खर्च भागवायचा कसा? ३-३ महिने विद्यावेतन मिळणार नसेल तर त्याने निवासाचा खर्च, भोजन खर्च कसा भागवायचा? तरी आमची मागणी आहे की, विद्यावेतन अभावी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात खंड पडू नये. याकरिता लवकरात लवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (BARTI) मार्फत स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ विद्यावेतन देण्यात यावे व येत्या वर्षा पासून महागाई निर्दशांकानुसार मासिक विद्यावेतनात वाढ करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी मार्फत (BARTI) पुणे च्या ऑफिस समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा महासचिव (दक्षिण) उमर फारूक ककमरी, संजय कांबळे, अनिल मोरे, सुनील कोळेकर, सिद्धार्थ कोलप, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *