लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या कवडजई व किन्ही या दोन्ही गावातील वाचनालय कम ग्राम पंचायतचा भुमीपूजन सोहळा दिनांक १३ मे २०२२ रोजी संपन्न होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कवडजर्इ आणि किन्ही गावातील नागरिकांना विकासकामांसंदर्भात दिलेल्या वचनाची पुर्तता या निमीत्ताने होत आहे. किन्ही या गावातील भुमीपूजन सोहळा सायं. ७.०० वा. असून कवडजई गावातील भुमीपुजन सोहळा रात्री ८.०० वा. संपन्न होणार आहे.
वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या शुभहस्ते भुमीपूजन सोहळा संपन्न होणार आहे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, माजी जि.प. सदस्या वैशाली बुध्दलवार, राजू बुध्दलवार, सुनिल फरकडे, माजी सभापती इंदिरा पिपरे, कवडजईचे सरपंच शालीक पेंदराम, किन्हीच्या सरपंच संगीता महादेव सत्रे व ग्राम पंचायत सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे.
आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर वाचनालय कम ग्राम पंचायत भवनाच्या भूमीपूजन सोहळयाला गावातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राम पंचायत किन्ही व कवडजई द्वारे करण्यात आले आहे.