लोकदर्शन👉 राहूल खरात
माढा, – इन्कम टॅक्स एस.सी., एस. टी व ओबीसी वेल्फेअर असोसिएशन मुंबई यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षांपासून महेंद्र अहिरे यांच्या नावे दिला जाणारा विशेष कार्य पुरस्कार यावर्षी कुष्ठरोग तंत्रज्ञ यू.एफ. जानराव यांना जाहीर करण्यात आला आहे. यू.एफ. जानराव हे गेल्या ४२ वर्षांपासून कुष्ठरोगी महारोग्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी काम करत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही स्वखर्चाने त्यांच्या जखमावर मलमपट्टी करीत असून याची दखल घेऊन या वर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील आयकर भवनमध्ये शुक्रवार13 मे रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,