लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा 68 वा वाढदिवस 10 मे रोजी स्वाभिमान दिन घोषित करून सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे जिल्हा सदस्य डॉ. राजेश साठे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तर सोनकीरे येथे ऍड. संघर्ष गोतपागर यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
आटपाडी तालुक्यात तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे व ज्येष्ठ नेते अरुणभाऊ वाघमारे यांच्या उपस्थितीत शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच पलूस तालुक्यात विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित बनसोडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण, शालेय साहित्य व मिठाई वाटप करून प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे शिराळा तालुका अध्यक्ष निखिल कांबळे यांच्या उपस्थितीत शिराळा शहरात वृक्षारोपण करण्यात आले.
आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिन हा पक्षाच्या वतीने स्वाभिमानदिन म्हणून घोषित केला असून संपूर्ण राज्यभराप्रमाणे या वर्षी जिल्ह्यात वायफट खर्चाला बगल देत उपयुक्त अशा विविध उपक्रमानी जिल्हाभर स्वाभिमान दिन साजरा झालेचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी सांगितले.