लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 9 एप्रिल दिनांक 9 मे 2022 रोजी भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी भाऊसाहेब अंधारे यांना महागाईच्या भस्मासुराच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन हे प्रचंड वाढलेल्या महागाईला अनुसरून देण्यात आले. सध्याचे पेट्रोल डिझेलचे भाव बघता महागाईने आसमान कवेत घेतले आहे.तसेच किरकोळ बाजारात व किराणा दुकानात किमती या साधारण दुपटीने वाढल्या आहेत.याचा परिणाम माणसांच्या कामगारांच्या गरिबांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात होत आहे. सदरची बाब गंभीर असून या राज्यांमध्ये या देशांमध्ये विरोधी पक्ष हा कमजोर असल्याने या सरकारला जाब विचारणारे कोणी नाही.त्यासाठीच भारतीय मजदूर संघ रस्त्यावरती उतरला आहे.प्रचंड वाढलेली महागाई कमी करण्यासाठी आगामी काळात राज्य सरकारने सर्व कर कमी करून गोरगरीब कष्टकरी जनतेला दिलासा द्यावा. यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत एक पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांच्या नावाने कार्यकर्त्यांनी आक्रोश स्वरूपात दिलेले आहे.
जर या पत्रावर उचित विचार केला नाही तर भारतीय मजदूर संघाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा रायगड जिल्ह्याचे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला आहे. उपाध्यक्ष मधुकर पाटील, ऍड विशाल मोहिते सचिव महाराष्ट्र प्रदेश, धर्माजी पाटील,मंगेश पवार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.