आम्ही काँग्रेस प्रणित शेतकरी विकास एकता पॅनलचेच : त्या ३ सदस्यांनी केले स्पष्ट.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


देवाडा आदिवासी सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात.

भीमराव बंडी यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.

राजुरा (ता.प्र) : राजुरा तालुक्यातील देवाडा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नुकतेच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास एकता पॅनलने एकहाती सत्ता प्राप्त केली. आज आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. या प्रसंगी लक्कडकोट चे माजी सरपंच तथा शे. संघटनेचे कार्यकर्ते भीमराव हनुमंतू बंडी यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास एकता पॅनलचे १३ ही सदस्य विजयी झालेत. विजयी उमेदवारांपैकी सजनाबाई जंगु आडे, भगवान नारायण हरणधरे, भिमराव भोजी कन्नाके यांच्या गळ्यात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी शे. संघटनेचा दुप्पटा टाकून संघटनेचे सदस्य भासविले परंतु आम्ही ३ ही सदस्य लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित पॅनल चे उमेदवार म्हणून निवडणूक आलो असून आमचा आमदार सुभाष धोटे यांच्यावर पुर्ण विश्वास आहे. विरोधकांनी त्यांच्या पक्षाचे सदस्य म्हणून भासवून केविलवाणा प्रयत्न केला असला तरी आम्ही काँग्रेस सोडून कदापि जाणार नाही आणि आयुष्यभर काँग्रेसची साथ कधी सोडणार नाही अशी ग्वाही एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपसभापती मंगेश गुरनुले, खातेदार कर्जदार गटातून निवडून आलेले चंद्रभान आडे, भीमराव कनाके, केशव कुमरे, जैतू कुलसंगे, मारोती मेश्राम, मारू वेडमे व सर्वसाधारण बिगर आदिवासी खातेदार गटातून निवडून आलेले अब्दुल जमीर, भगवान हरणधरे, राखीव आदिवासी महिला गटातून निवडून आलेले राजूबाई नायनल्लू, साजनाबाई आडे, अनुसूचित जाती गटातून निवडून आलेले लालचंद करमनकर, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून निवडून आलेले शंकर बोकूर, इतर मागासवर्गीय गटातून निवडून आलेले सत्यपाल जाबोर यासह सर्व विजयी सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *