१६ कोटीच्या मंजूर निधीतून रस्ते निर्माणकामाला सुरूवात.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा बामनवाडा, धोपटाळा, चिंचोली, गोवरी, कुर्ली येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात मौजा धोपटाळा येथे सास्ती ते राजुरा मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे, किंमत ५ कोटी, चिंचोली येथे चिंचोली गोवरी रस्त्याचे रुंदीकरण सहित बांधकाम करणे, किंमत २ कोटी, पोवनी येथे पोपनी गोवरी वळण रस्त्याचे काम करणे, किंमत ८ कोटी, बामनवाडा येथे मुख्य रस्ता ते कुरूमदास पावडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, किंमत १५ लक्ष, कुर्ली येथे पांदण रस्त्याचे बांधकाम करणे, किंमत २० लक्ष अशा एकूण १६ कोटी रुपये मंजूर निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन करून निर्माण कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अभियंता आकाश बाजारे, धोपटाळाचे माजी सरपंच राजू पिंपळशेंडे, राजाराम येल्ला, रामपूर चे माजी सरपंच मंजुषा खंडाळे, चिंचोली चे माजी सरपंच वसंता ताजने, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, बामनवाडा चे सरपंच भारती पाल, उपसरपंच अविनाश टेकाम, माजी सरपंच कविता उपरे, योगिता भोयर, प्रा. दिनेश दुर्योधन, विहिरगावचे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर, शिवराम लांडे, ग्रा प सदस्य जगदिश बुटले, ब्रिजेस जंगिडवार, संगीता हिवराळे, लक्ष्मी चौधरी, सर्वानंद वाघमारे, प्रफुल चौधरी, समिक्षा झाडे, भारती करमनकर, सुजाता मेश्राम, कुरूमदास पावडे, प्रदीप पाल, श्रिकांत करमनकर, प्रणित झाडे, रवींद्र वाघमारे, पुरूषोत्तम काळे, तमुस अध्यक्ष केशव काळे, नरेश टोंगे, अशोक उरवेते, नामदेव अहिरकर, जनार्दन काळे, चिमनाजी वडस्कर, विठोबा वैध, कान्होजी हिंगाणे, मनोहर दुर्योधन, प्रभाकर बघेल, अनंता एकडे, कोमल पुसाटे, हारून शेख, इंदुताई जांभळे, के. ए. मांढरे, श्रिधर रावला यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.