जनसंपर्क कार्यालय जनतेला न्याय मिळवून देणारे केंद्र व्हावे. — आमदार सुभाष धोटे।                                                .

. लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕रामपूर येथे आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथे रामपूर, धोपटाळा, सास्ती येथील नागरिकांच्या समस्या जाणून निराकरण करण्यासाठी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रामपूर येथे आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी आमदार सुभाष धोटे यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आपण विशेष प्राधान्य देणार असून रामपूर, धोपटाळा, सास्ती या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच हे जनसंपर्क कार्यालय सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे केंद्र म्हणून कार्य करावे, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार आणि परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी सरपंच राजु पिंपळशेंडे, मंजुषा खंडाळे, राजाराम येल्ला, ग्रा. प सदस्य जगदिश बुटले, ब्रिजेस जंगिडवार, संगीता हिवराळे, लक्ष्मी चौधरी, अनंता एकडे, प्रभाकर बघेल, संतोष शेन्डे, कोमल पुसाटे, रतन गर्गेलवार, माधव बोढे, हारुण शेख, एकनाथ खडसे, दिलीप मुडपल्लीवार, नागेश मेदार, आर आर यादव, देवेंद्र काकुरी, विजय कानकाटे, एम के सेलोटे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, क्रिष्णा कूमार, रामचंद्र कूमार, रामराव सिंगाराव, रमेश रणदिवे, विठ्ठल रासेकर बंडू भोयर, अरूण मोहितकर, श्रिधर रावला, विजय कुडे, दिलीप गिरसावळे, श्रिकांत गोडसेला, गोपाल बुरांडे, पुंडलिक सत्रे, सोमेश्वर सपाट, अशोक मून, भाऊराव इटणकर, सतीश चौधरी, मंगेश बोबडे, अब्बास अली, इंदुताई जांभुळे, के. ए. मांडरे, सुरेंद्र गीते, सुधाकर उईके, श्रिधर पुलीपाका, के समय्या, तिरुपती सातूर, आनंद तोंडरा, सिनु गड्डम, मारोती जुलमे, अफसर सिद्धिकी, अशोक कुडे, जान बाबु, श्याम वाघमारे, राजेश आवनुरी, नरसिंग भुपेली, जावेद खान, शंकर सतपलकर यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *