लोकदर्शन 👉 राहुल खरात
*⭕गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार सोहळा संपन्न*
आज ७ मे २०२२ रोजी वसगडे तालुका पलुस येथे “पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पलुस” च्या सांगली शाखेचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पलूस ही गेली पाच वर्षे अनेक शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर राबवत असून या संस्थेने जिल्हा स्तरावर आपली स्वतंत्र शाखा सुरू करून आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सांगली शाखेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज वसगडे येथे ग्रामपंचायत सभागृहात विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा संस्थेने आयोजित केला होता. यामध्ये व्यवसायात अल्पावधीत नाव कमवून सांगली जिल्ह्यातील दर्जेदार कन्स्ट्रक्शन म्हणून नुकताच ज्यांना आदर्श उद्योजकता पुरस्कार नाशिक येथे मिळाला ते माणकोजी कन्स्ट्रक्शन चे प्रमुख राकेश माणकोजी तसेच आरटीओ परीक्षेत ज्यानी नुकतेच उज्वल यश संपादन करून वसगडेचे नाव सर्वदूर पोहचवले ते सागर खटावकर तसेच जय भारत विद्यालय वसगडे येथील नववीत शिकणारी विद्यार्थिनी सृष्टी सुदर्शन पाटील हिने एन एम एम एस परीक्षेत विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण होऊन डॉक्टर होमी जहांगीर बाबा परीक्षेत सिल्वर मेडल मिळवले त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे आणि ज्यांची पद्मशीला संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली ते पलूस सहकारी बँकेचे संचालक,पद्मशिला संस्थेचे नूतन अध्यक्ष नितीन खारकांडे व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक,पद्मशीला संस्थेचे सचिव मारुती शिरतोडे या मान्यवरांचा सत्कार सोहळा संस्थेने मोठ्या उत्साहात घेतला. या सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पलूस पंचायत समितीचे सदस्य अमोल पाटील,वसगडेचे उपसरपंच संपतराव पवार ,पद्मशीला संस्थेचे सांगली शाखेचे अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी ,जय भारत विद्यालय वसगडे चे मुख्याध्यापक राजोबा सर ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,संस्थेचे संस्थापक अजित खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष नितीन खारकांडे म्हणाले पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही विविध क्षेत्रात काम करणारी आणि सामाजिक, शैक्षणिक,कला,क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारी आगळीवेगळी संस्था असून संस्थेच्या सांगली शाखेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज सन्मानीत केलेल्या व्यक्तीं निश्चितपणे आपलं नाव,आपल्या गावाचे नाव भविष्यातही उज्वल करतील. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री जाधव सर यांनी केले तर आभार श्रीधर कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील गुरव, राजाराम पाटील, लक्ष्मणराव चव्हाण, कोळी सर,गुरव सर वसगडेचे ग्रा.पं.चे सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.