लोकदर्शन 👉 मोहन भारती
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील सहाय्यक शिक्षिका सौ विद्या शुद्धोधन कांबळे ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त त्यांचा संस्थेच्या वतीने तसेच विद्यालयातील शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने निरोप तथा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव, माजी प्राचार्य नामदेवराव बोबडे ,संचालक नोगराज मंगरूळकर, माधवरावजी मंदे संचालिका नलिनीताई डोहे ,इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वर्षा गुडधे, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे पर्यवेक्षक संजय गाडगे तसेच सत्कार मूर्ती विद्या कांबळे शुद्धोधन कांबळे उपस्थित होते .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथींच्या हस्ते सौ कांबळे यांचा पतीसह संचालक मंडळाच्या वतीने व विद्यालयातील तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भावी आयुष्य सुखसमृद्धी चे व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
भावपूर्ण सत्कार ला उत्तर देतांना सौ कांबळे यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी तसेच संचालक मंडळाविषयी कृतज्ञता प्रकट करून भविष्यात समाजसेवा करत राहू असे विचार व्यक्त केले याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यालयातील तथा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र कुमार ताकसांडे यांनी तर आभार उच्च माध्यमिक शिक्षक नितीन सुरपाम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता कु. तकसांडे मॅडम ,मेहेरकूरे सर, दिनकर,सातारकर सर,गुजर सर, डफाडे सर ,झाडे सर, सुषमा चवरे ज्योती चटप,नामदेव बावनकर, माधुरी उमरे, शशिकांत चन्ने, संकल्प भा, लीलाधर मत्ते सिताराम पिंपळशेंडे, यांच्यासह सर्व शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.