लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– वर्तमान काळातील तणावपूर्ण जीवनशैलीत योग आणि प्राणायाम स्वीकरल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधीपासून मनुष्य दूर राहु शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते त्यामुळे शक्य असेल तर प्रत्येकांनी आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून योगाचा स्विकार करावा असे मत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी २५ दिवसीय सहयोग प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान (न्यास) किसान सेवा समिती ,युवा युवती संघटना राजुरा. जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन भवानी माता मंदिर सभागृह राजुरा येथे करण्यात आले आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक माजी आमदार ॲड. वामनराव चटप, प्रमुख अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी अध्यक्ष बार असोसिएशन ऍड अरुण धोटे, जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान संघटना विजय चंदावार, जिल्हा प्रभारी महिला पतंजली योग समिती सौ स्मिता रेवभकर, जिल्हा संघटना मंत्री भारत स्वाभिमान संघटना शरद व्यास, अनिल चौधरी, भावना भोयर, नीलिमा सेलोटे, नीता बोरीकर, पुष्पा गिरडकर, अलका कन्द्रकला खंडाले, मालेकर गंगाशेट्टीवर, देविदास कुईटे, शिंदे जोत्सना, जीतेंद्र ननंदरधने, मालेकर, एम के सेलोटे, ॲड. मेघा धोटे, सिंधुताई गिरसावळे, अंजली गुंडावर यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कृतीका सोनटक्के यांनी केले. प्रास्ताविक पुंडलिक उरडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. हरिभाऊ डोर्लीकर यांनी मानले. या २५ दिवसीय योग शीबिराचा लाभ राजूरवासीयांनी घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.