*लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :-०२/०५/२०२२ :-* दक्षिण सोलापूर कुंभारी येथील माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्थेच्या वतीने राबवित असलेल्या प्रंलबित विडी घरकुल योजना पुर्वरत सुरु होण्याकामी यशस्वी प्रयत्न केल्याने माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण सेस्थेच्या वतीने खासदार श्री. जय सिध्देश्वर महाराज यांचा विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्थेच्या वतीने दक्षिण सोलापूर कुंभारी येथे महिला विडी कामगारांसाठी ३७७० घरकुलांची योजना हाती घेण्यात आली. त्यापैकी ११७० घरे पुर्ण झाले असून लाभार्थीं यांना ताबा देण्यात आलेली आहे. ऊर्वरित २६०० घरे काही तांत्रिक व घरांचे किंमती वाढल्याने सुमारे ६ ते ७ वर्षापासून प्रलंबित राहिले. सदर योजना पुर्ण करणेकामी शिवसेना नेते खासदार मा.श्री. अरविंद सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे पाढपुरावा चालू आहे. श्री. अरविंद सावंत साहेब यांच्या सुचनेनुसार सोलापूरचे खासदार श्री. जय सिध्देश्वर महाराज यांच्या मार्फत केंद्रीय कामगार मंत्री श्री. भुपेंद्र सिंह यांची भेट घेऊन बेघर गरीब महिला कामगारांचे घरे पुर्ण होण्यासाठी मदत करावे अशा आशयाचे निवेदन श्री. जय सिध्देश्वर महाराज यांच्या मार्फत देण्यात आला. त्यावरून नागपूर वेलपर आयुक्त भारत सरकार यांनी माँ साहेब संस्थेला पुढील कामकाज करण्यासाठी काही नियम व अटी घालुन परवानगी दिल्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्थेच्या वतीने दि २९ एप्रिल रोजी सोलापूर येथील जय सिध्देश्वर महाराज यांच्या शेळगी मठात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), श्रीनिवास चिलवेरी, संतोष गद्दे, दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर आदि उपस्थित होते.
*➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*फोटो मॅटर :- माँ साहेब विडी कामगार गृहनिर्मांण संस्थेचे अडचणी दूर करणेकामी जय सिध्देश्वर महाराज यांनी यशस्वी प्रयत्न केल्याने संस्थेच्या वतीने त्यांना संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. सदर प्रसंगी श्रीनिवास चिलवेरी, संतोष गद्दे दिसत आहेत.*