लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध विषयातील पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रा मध्ये विविध विषयांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम अत्यल्प प्रमाणात असून उपरोक्त अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्वावर आहे आणि पदवी स्तरावरील मान्यताप्राप्त शिक्षकांनाच पदव्युत्तर अभ्यासक्रम घ्यावे लागत असल्याने विशेष असे मान्यता पत्र त्यांना दिले जात नाही त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या कमी आहे. पदव्युत्तर शिक्षक म्हणून म्हणून मान्यता मिळण्यासाठी अनेक अडचणी ना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता दिल्यास विविध समित्या व प्राधिकारणावर शिक्षकांचा सहभाग घेता येईल आणि विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विकासाला चालना प्राप्त होईल अशी भूमिका संघटनेने आपल्या निवेदनातून विशद केली आहे.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यासंबंधीचे निवेदन दिले आहे यावेळी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स चे सचिव डॉ.विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ.प्रमोद बोधाने, सहसचिव डॉ.राजू किरमिरे, डॉ.विठ्ठल ठावरी, डॉ.कैलास भांडारकर, प्रा.अजय निंबाळकर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.