महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा येथे ध्वजारोहण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तहसील कार्यालय राजुरा येथे आज दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना आणि क्षेत्रातील समस्त जनतेला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, नायब तहसिलदार अतुल गांगुर्डे, पोलिस निरिक्षक बहादूरे, मुख्यधिकरी सूर्यकांत पिदुरकर, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, माजी जि. प. सदस्य मेघा नलगे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद सकावत अली, माजी नगसेवक गजानन भटारकर, हारजितसिंग संधू, जयपूरकर, ॲड चन्द्रशेखर चांदेकर, अजय बतकमवार, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीवृंद आणि नागरिक उपस्थिती होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *