लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण विश्वात सुख,शांती राहण्यासाठी समाजप्रबोधन केले,सर्वं धर्म समभाव ची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, शिकवण प्रत्येकाने अंगीकरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा, आशीष देरकर यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले,आज सर्वत्र जातीभेद उफाळून आला आहे अशावेळी राष्ट्रसंत च्या सामूहिक प्रार्थना ची नितांत आवश्यकता आहे असे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिता चिताडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षिका शोभा जीवतोडे, पर्यवेक्षक एच. बी. मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे होते.
सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा प्रदीप परसुटकर यांनी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले,
याप्रसंगी पर्यवेक्षिका शोभा जीवतोडे प्रदीर्घ सेवेनंतर 30 एप्रिल ला सेवानिवृत्त होत असल्याने प्राचार्या स्मिता चिताडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.