कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप.

 

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे )


दि 29एप्रिल मान. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 28/04/2022 गुरुवार रोजी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि मान उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव आणि मंडळ अधिकारी मनोज मोरे, प्रभाकर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील गिरवले , भेरले , खानावले, पोयनजे , पाले बुद्रुक , बारवई , समता नगर कातकरी वाडी अश्या अनेक कातकरी वाड्यावर जावून जातीचे दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

 

एकूण अंदाजे एक हजार जातीचे दाखले वाटप करण्यात आले. सदर वाटप कार्यक्रमास मंडळ अधिकारी प्रभाकर नाईक, कोतवाल प्रकाश पडवळ, गिरवले ग्राम पंचायत उप सरपंच प्रताप हातमोडे, विक्रम हातमोडे , भेरले ग्राम पंचायत सदस्य बंधू सोमा मोरे, पोयनजे ग्राम पंचायत सरपंच जगदीश मते, बारवई ग्राम पंचायत सरपंच बाबरे मॅडम , खानावले ग्राम पंचायत सरपंच नाईक मॅडम उपस्थित होत्या. जातीचे दाखले मिळाल्यावर आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर खुप आनंद दिसत होता. सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांनी ह्या दाखल्यांसाठी खूप मेहनत घेतल्या मुळेच हे दाखले तयार झाले आणि ज्यांचे जातीचे दाखले काढायचे बाकी आहेत त्यांच्याकरीता पुन्हा लवकरच उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कॅम्प घेण्यात येणार आहे असे प्रा राजेंद्र मढवी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here