लोकदर्शन 👉 राहुल खरात
महाराष्ट्रातील साहित्यीक, विचारवत, कवी, साहित्यप्रेमी, सामाजिक सांस्कृतिक चळवळीतील प्रमुख नते, कार्यकते यांना विनंती करणेत येते की, थोर साहित्यीक डॉ. शंकरराव खरात हे लेखक, कादंबरीकार, समाजसुधारक, माजी कुलगुरु डॉ. महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. मराठी साहित्य समृध्द करण्यात ज्या साहित्यीकांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यात डॉ. शंकरराव खरात यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी शोषीत, उपेक्षित समाजाचे दुःख वेदना आपल्या साहित्यात मांडून त्याला वाचा फोडली. तराळ-अंतराळ हे आत्मचरित्र तसेच बारा बलुतेदार माणुसकीची हाक, सांगावा अशा अनेक कथा कादंबऱ्या व ललीत, आत्मचरित्र इत्यादी पुस्तके मराठी साहित्यातील मैलाचा दगड आहे.
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, संपादक, रिझर्व्ह बँक व रेल्वे बोर्डाचे सदस्य, बैंक ऑफ इंडियाचे संचालक, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण कमिटीचे अध्यक्ष, जिल्हापरिषदेच्या घटना समितीचे प्रमुख आदि पदे त्यांनी भूषविलेली आहेत. साहित्य विश्वातील नामवंत साहित्यीकात त्यांची गणना होते. अशा डॉ. शंकरराव खरात यांचे आटपाडी, जि. सांगली हे जन्मगाव असून ते या गावचे सुपुत्र होते. त्यांच्या जन्म भूमीत त्यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने उभे करावे म्हणून आम्ही शासन दरबारी मा. ना. उध्दवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तसेच मा. ना. जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री (पालकमंत्री सांगली जिल्हा) मंत्रालय मुंबई व खानापूर आटपाडीचे आमदार अनिल भाऊ बाबर साहेब विटा यांचेकडे स्मारकाच्या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत.
तेव्हा आपणास सुध्दा विनंती करणेत येते की, डॉ. शंकरराव खरात यांचा जन्मदिन दि. ११ जुलै १९२१ रोजी व स्मृती दिन ९ एप्रिल २००१ रोजी असतो. त्यांचे परिनिर्वाण होऊन २१ वर्षे ९ झाली आहेत. म्हणून आटपाडी, जि. सांगली येथे थोर साहित्यीक डॉ. शंकरराव खरात यांचे स्मारक शासनाने उभे करावे म्हणून आपण शासनास निवेदन देऊन सहकार्य करावे, ही विनंती.
कळावे
आपले विश्वास,
डॉ. शकुंतला शंकरराव खरात
अध्यक्षा
डॉ. रविंद्र शंकरराव खरात
उपाध्यक्ष
आयु विलास खरात सचिव