‘वामनदादांच्या गझलांचे सौंदर्यविश्व’ ग्रंथ प्रकाशित
लोकदर्शनचंद्रपूर :👉 अविनाश पोईंकर
चंद्रपूर येथील प्रसिद्ध लेखिका व समीक्षक डॉ.प्रतिभा वाघमारे-खोब्रागडे यांच्या ‘वामनदादांच्या गझलांचे सौदर्यविश्व’ या समीक्षाग्रंथाचे प्रकाशन प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पार पडले. बुलढाणा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनात या समीक्षा ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष साहित्यिक अर्जून डांगळे, स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर, मंत्रालय सहसचिव सिद्धार्थ खरात, बारोमासकार डॉ.सदानंद देशमुख, गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’, राहुल खांडेकर उपस्थित होते.
वामनदांच्या गझलांचे सौंदर्यविश्व’ या ग्रंथात प्रतिमासौंदर्य, आशयसौंदर्य, लयबद्धता, गझलेतून येणारी प्रतीके अशा अनेक विषयांचे साक्षेपी समीक्षण या ग्रंथात डॉ.प्रतिभा वाघमारे-खोब्रागडे यांनी केले आहे. वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षात महत्त्वाचा ग्रंथ साकार झाला असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या संशोधीत ग्रंथाचे कौतुक केले. डॉ.प्रतिभा वघमारे-खोब्रागडे या मागील दोन दशकांपासून वामनदादांच्या साहित्यावर चिकित्सक संशोधन करत असून मराठीतील आद्य गझलकार म्हणून वामनदादांच्या गझलांची त्यांनी मांडणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने साहित्य रसिकांची उपस्थिती होती.
•••