.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕परिसराला स्वतः भेट देऊन केली पाहणी, जानून घेतल्या नागरिकांच्या समस्या.
राजुरा (ता.प्र) :– राजुरा विधानसभा मतदारसंघातील भेंडारा प्रकल्पाचे निर्माण कार्य गेली पंचवीस ते तीस वर्षापासून सुरू आहे. यासाठी बेरडी (जुनी) हे गाव बुडीत क्षेत्रात येत असल्याने गावाचे पुनर्वसन करण्यास मंदाने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली. परंतु पुनर्वसित ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने नागरिक त्याला प्रतिसाद देत नाहीत. याबाबत बेरड अर्जुनी येथील नागरिकांनी सुविधांविषयी आमदार सुभाष धोटे यांच्याशी चर्चा केली. त्या अनुषंगाने धोटे यांनी अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी केली. भेंडारा मध्यम प्रकलपाच्या बुडीत क्षेत्रात बेरडी गाव बाधित होत असल्याने पुनर्वसन बामनवाडा जवळील सर्वे नंबर १२३ चे सरकारी जमिनीवर करण्याचे ठरले. परंतु अशा ठिकाणे भौतिक सुविधा नसल्याने त्याठिकाणी स्थलांतरित होण्यास नागरिकांनी नकार दिला व ही बाब राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत आमदार सुभाष धोटे यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्यासमवेत भेंडारा मध्यम प्रकल्प विभागाच्या अधिकारी व गावकरी यांच्यासोबत प्रत्यक्ष पुनर्वसन ठिकाणाची पाहणी करून सर्व सुविधा निर्माण करून देण्याच्या सूचना दिल्या इंदिरानगर ते बेरडी पुनर्वसन ठिकाणापर्यंत सुसज्ज निर्माण रस्ता १५ मे पर्यंत निर्माण करावा, पिण्याच्या पाण्याची सुविधा २० मे पर्यंत पूर्ण करावी, विद्युतीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत,अंतर्गत रस्ते पूर्ण करावे स्मशानभूमी शेड इतरत्र बांधकाम करून देण्यात यावे तसेच इतर आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करून देण्याबाबतच्या सूचना आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
या प्रसंगी राजुरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, भंडारा मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रमोद वाकोडे, तहसीलदार हरीश गाडे, उपअभियंता राजेश वाघमारे, कनिष्ठ अभियंता तुषार डोंगरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उप अभियंता गोरलावार, माजी सभापती मंगेश गुरनुले, घनश्याम मेश्राम, चेतन जयपुरकर तसेच वीज वितरण विभागाचे अधिकारी तुळशीराम किनाके, रघुदास किनाके, सुनील तोडासे, मारुती सोयाम, बापूजी गेडाम, सुनील गेडाम, सुरेश तोडासे, चूडामण शेंडे, सुरेश आत्राम, सिताराम तोडासे व गावकरी उपस्थित होते,