लोकदर्शन उरण 👉 (विठ्ठल ममताबादे )
उरण दि28एप्रिल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई येथील प्रभारी मुख्याध्यापक सुभाष रामभाऊ म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवार दि 27/4/2022 रोजी सकाळी 11 वाजता रा.जि. प शाळा मोठी जुई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश स्तवनाने झाली. यावेळी सुप्रसिद्ध गायक गणेश प्रसाद गावंड यांनी श्री गणेश स्तवन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चिरनेर केंद्र प्रमुख टी जी म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
विविध शिक्षक, विद्यार्थी पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष टी जी म्हात्रे चिरनेर केंद्र प्रमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की मुख्याध्यापक सुभाष रामभाऊ म्हात्रे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून विद्यार्थीप्रिय शिक्षक व मुख्याध्यापक आहेत. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोठी जुई शाळेला आदर्श शाळेचा शासनातर्फे पुरस्कार मिळाला आहे. त्यात सुभाष म्हात्रे सरांचा सिंहाचा वाटा आहे.एकूण 34 वर्षे,2 महिने,9 दिवस त्यांनी सेवा केली.शाळेची,विद्यार्थ्यांची,समाजाची प्रगती कशी होईल यासाठी त्यांची धडपड नेहमी असते. ती धडपड आम्ही सर्वांनी जवळून बघितली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे सर यांचा आज सेवानिवृत्ती निरोप समारंभ आहे. सर्व विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी वर्गाना आज जड अंतकरणाने सुभाष म्हात्रे सरांना निरोप द्यावा लागत आहे.पुढील सर्व आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे आनंदाचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना असे सेवानिवृत्तपर शुभेच्छा देत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा चिरनेर केंद्र प्रमुख टी जी म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ललिताताई पाटील सरपंच मोठीजुई,पुरुषोत्तम भोईर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तृप्ती ताई बंडा उपाध्यक्षा शा.व्य. समिती, शिक्षक वाय. एस पाटील,कौशिक ठाकूर ,हितेंद्र म्हात्रे, महेश गावंड इत्यादी मान्यवर,केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक वृंद, मोठी शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत मोठी जुईचे ग्रामपंचायत सदस्य, पालक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे सर यांना विविध भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घेत शिक्षक वर्गानी, विद्यार्थ्यांनी,पालकांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याने व सर्वांचे प्रेम पाहून सुभाष म्हात्रे यांना अश्रू अनावर झाले.त्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. शिक्षण क्षेत्रात आलेले चांगले वाईट अनुभव उपस्थितांना सांगत ते भावुक झाले होते. शेवटी प्रभारी मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक संजय होळकर यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी जुई जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती व गोवलदेव महिला बचत गट, मोठीजुई ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.चंद्रकांत कुथे यांनी स्वागतपर काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेतली.एकंदरीत प्रभारी मुख्याध्यापक सुभाष रामभाऊ म्हात्रे यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.