लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा:– राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती येथील विजय तुळशीराम शेंडे हे सध्या भारत बांगलादेश सिमेवर कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत देशाच्या अनेक भागात सिमेवर संरक्षण कार्यत सेवा दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विजय ने सामाजिक भान ठेवून आपला जन्मदिवस, मुलांचे जन्मदिवस सामाजिक दायित्व निभावून साजरे केले आहेत. यावेळी चक्क आपल्या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने त्याने पून्हा सामाजिक उपक्रम राबऊन डेबू सावली वृदाश्रम चंद्रपूर येथील वृध्द माता, पिता यांच्या सोबत आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रपरिवार यांना सोबत घेऊन लग्नवाढदिवस साजरा केला. येथील वृध्दांना फळे, मिठाई वाटप केली, अन्नदान केले आणि चेकद्वारे फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात आर्थिक मदत केली.
या प्रसंगी फौजी विजय शेंडे यांनी आपल्या धर्मपत्नी शिल्पा शेंडे यांच्या निरपेक्ष प्रेम आणि त्यागामुळेच आपण देशाच्या सिमेवर अढळपणे काम करीत असून तीच्या सहकार्यातूनच आपण सामाजिक ऋण फेडण्यासाठी वेळोवेळी असे उपक्रम घेऊन सामाजिक दायित्व पार पाडीत आहे आणि यापुढेही असेच काम करीत राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. या प्रसंगी यंगचांदा ब्रिगेड चे चंद्रपूर शहर प्रमुख राहुल मोहुर्ले, शेंडे, मोहुर्ले कुटुंब, मित्रपरिवार आणि डेबू सावली वृदाश्रमाचे वृध्द मिता पिता, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.