अचानक लागलेल्या आगीमुळे निलगिरी प्लांट जळून खाक. सिंधी येथील सरस्वती ढुमने यांचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे आज दुपारच्या सुमारास ग्रामपंचायत परिसरास लागून असलेल्या शेत शिवारात अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि यात सिंधी ग्रामपंचायतचे उपसरपंच रामभाऊ ढुमने यांच्या आई सौ. सरस्वती आबाजी ढुमने यांच्या मालकीच्या निलगिरी प्लांट मधिल निलगिरी वृक्ष पुर्णपणे जळून खाक झाले आहेत. या आगीत ढुमने यांच्या २ एकर जमीनीवरील निलगिरी जळून खाक झाले आहेत. यात त्यांचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.
सदर आगीचे वृत्त समजताच ढुमने कुटुंब आणि स्थानिक गावकरी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र कडक उन्हात हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यानंतर धानोरा साजाचे पटवारी यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली असून ते घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करणार असल्याची माहीती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here