जलोकदर्शन 👉 मोहन भारती
जीवती येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त भव्य आरोग्य शिबीर 24 एप्रिल ला आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत , . जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे , जीवती नगर परिषदेच्या
अध्यक्ष सौ. सविताताई आडे, उपाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे व इतर मान्यवर हजर होते.सदर शिबिरात 520 रुग्णांनी लाभ घेतला.त्यापैकी 319 पुरुष व 201 महिला होत्या.सदर शिबिराला शालिनीताई मेघे रुग्णालय येथून कान, नाक, घसा तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ,फिझीशियन यांची चमू आली होती.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथून बालरोग तज्ञ व नेत्ररोग तज्ञ यांची चमू आली होती.सदर शिबिरात कुष्ठरोग, क्षयरोग, हत्तीरोग, हिवताप,आयुष्यमान भारत कार्ड वाटप असे आदींचे प्रदर्शनी लावण्यात आली होती.