लोकदर्शन 👉 मोहन भारती
मुंबईत रुग्णसंख्या वाढलीय तर देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत
२७ तारखेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे (फाइल फोटो)
देशातील करोना रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये रविवारी विक्रमी १४४ रुग्ण आढळून आले आहेत. करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा म्हणजेच २७ एप्रिल रोजी एक बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आलंय.
देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि या दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये असतील. या बैठकीमध्ये करोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी राज्यांना निर्देश देण्याबरोबरच काही धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.