⭕ना. जयंतराव पाटीलसाहेब
जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री यांना दिले
लोकदर्शन आटपाडी ;👉 राहूल खरात
आटपाडीचा साखर कारखाना चालू करणेबाबत.
आपल्या कृपादृष्टीने आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी बऱ्यापैकी
-आल्यामळे उसाच्या शेतीत वाढ झाली असून उस गाळप करणारा
कारखाना बंद पडला आहे. खोपा केला आणि बैल मेला’ अशी वाईट
अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे.
ज्यांनी कारखाना काढला त्यांनाच द्यायचा अशी आपली सद्भावना
आहे. त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण ज्यांच्या बद्दल आपण
सहानुभुती दाखवता त्यांना कारखाना चालू करुन शेतकऱ्यांना मदत
करण्याऐवजी त्यांचे राजकीय पुनवर्सन झाले पाहिजे असे त्यांचे विचार
असल्यामुळे ते कारखाना पुन्हा सुरु करतील असे वाटत नाही.
सबब आपण बँकेच्या चेअरमन यांना सदरचा कारखाना जो कोणी
चालविण्यास पुढे येतील त्यांना चालवण्यास द्यावा अगर भाडेतत्वावर
द्यावा व त्यासाठी आपण प्रयत्न करुन आटपाडी तालुक्यातील ऊस
बागायतदारांना मदत करावी. येणारा हंगाम चालू व्हावा अशी शेतकऱ्यांची भावना असून आपण एकमेव त्यांचे आशास्थान आहे.
कृपया मी आपणास आटपाडीतील तमाम ऊस बागायतदारांच्या वतीने आपणाकडे ही मागणी अंतःकरणपुर्वक करीत आहे. आपण ती पूर्ण कराल अशी नम्र अपेक्षा व्यक्त करतो.तुमचाच रावसाहेब पाटील, आटपाडी