लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते जिवती, पाटण येथे रुग्णवाहिकांचे लोकार्पण. आयुष्यमान कार्ड चे वितरण.
राजुरा :– आजादी का अमृत महोत्सव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय राजुरा, ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती या सर्व ठिकाणी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भव्य आरोग्य शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आरोग्य शिबीराचे औचित्य साधून जिवती तालुक्यातील प्राथमिक केंद्रांना जिवती व पाटण येथे दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, क्षेत्रातील गोरगरीब नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. आरोग्य शिबीराचे आयोजन करून रोगनिदान आणि उपचार उपक्रम सुरू केल्यामुळे अनेकांना लाभ होत आहे. यापुढेही क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी आरोग्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा मानून रुग्णसेवेसाठी परिश्रम घेतले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी जनतेसाठी एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आयुष्मान कार्ड च्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला ५ लक्ष विमा संरक्षण देण्यात आले. अनेकांना आयुष्यमान कार्ड चे वितरण करण्यात आले. वैद्यकीय मेळाव्यादरम्यान विविध माहितीचे स्टॉल उभारण्यात आले आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे वर्धा आणि मानवटकर हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर्स या शिबिरात सेवा देण्यासाठी आले होते. या अंतर्गत राजुरा येथे ९७१, गडचांदूर येथे ३९६, गोंडपिपरी येथे ६५२ आणि जिवती येथे ५२० नागरिकांना रोगनिदान आणि आरोग्यसेवा पुरविण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुडमेथे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, डॉ. स्वप्निल ठेंबे, डॉ संजय गाटे, जिवतीच्या नगराध्यक्षा सविता आडे, उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश गोतावडे, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती मुमताज जावेद, नगरसेवक विलास पवार, श्यामराव गेडाम, विजयमाला, अश्फाक शेख, सुग्रीव गोतावळे, गडचांदूर काँग्रेसचे गटनेते विक्रम येरणे, सुनील शेळके, वजिर सय्यद, राम चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले, डॉ. मानवटकर मॅडम, पोलीस निरीक्षक गडचांदूर प्रमोद शिंदे, सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, लाभार्थी यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.