एकोणा नोकरीचे आदेश 2 मे पासून तर धोपटाळा नोकरी प्रक्रीया येत्या 10 दिवसात

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕सीएमडी डब्ल्युसीएल यांचेशी हंसराज अहीर यांची चर्चा*

चंद्रपूर – धोपटाळा युजी टु ओसी प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रस्तावास येत्या 10 दिवसात मंजुरीची प्रक्रीया राबविण्यात येईल. एकोणा प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्तांना 2 मे पासून नोकरीचे मंजुरी आदेश दिल्या जातील असे स्पष्ट आश्वासन वेकोलि नागपूर मुख्यालयाचे अध्यक्ष प्रबंध निदेशकांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांना दि. 23 एप्रिल रोजी नागपुरात पार पडलेल्या बैठकीत दिले. या बैठकीत हंसराज अहीर यांनी चिंचोली रिकास्ट प्रकल्प, न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे, प्रकल्पग्रस्तांच्या नातु विषयक (ग्रॅंडसन) नोकरींचा प्रलंबीत प्रश्न, वाल्वो ट्रेनींग सेंटर आदी महत्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा केली.
नागपुरात आयोजित या बैठकीस माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा नेते खुशाल बोंडे, अॅड. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, तारेंद्र बोर्डे, छोटु पहापळे, मधुकर नरड, कोलगांवचे उपसरपंच पुरूषोत्तम लांडे, पवन एकरे, बबन निकोडे, संजय झाडे, पुरूषोत्तम हिंगाने, शरद चापले, अविनाश जाधव यांचेसह वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वेकोलि प्रबंधन जिल्ह्यातील खाण प्रकल्पग्रस्तांच्या न्यायोचित मागण्यांबाबत उदासीन धोरण स्विकारीत असल्याबाबत आक्रमक होत हे प्रश्न तातडीने निकालात काढण्याची सूचना हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना केली. प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी व त्यांच्या संयमांशी खेळण्याचा प्रयत्न वेकोलि प्रबंधनाने करू नये अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरू असा इशारा या बैठकीत हंसराज अहीर यांनी दिला.
यावेळी चिंचोली रिकास्ट प्रकल्पाचे डी-नोटीफीकेशन रद्द करून प्रकल्पग्रस्तांव्दारा प्रस्ताव आल्यास समाधानकारक तोडगा काढण्याची भूमिका वेकोलि प्रबंधनाने स्पष्ट केली. जी नोकरीची प्रकरणे न्यायलयीन प्रक्रीयेमुळे प्रलंबित आहेत व ज्या प्रकरणात स्टे आॅर्डर नाही असे नोकरीचे प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यावर वेकोलि भर देईल असे सांगीतले.
सेक्शन 9 च्या अधीसुचनेनंतर न्यायप्रविष्ठ प्रकरणात नोकरी प्रस्ताव प्रलंबित ठेऊ नये अशी सुचना हंसराज अहीर यांनी केली. यावर योग्य तो मार्ग काढला जाईल असेही प्रबंधनाव्दारे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत चंद्रपूर क्षेत्रातील वाल्वो ट्रेनींग सेंटर सीएसआर अंतर्गत बोर्ड अप्रुवल घेऊन सुरू करावा व प्रकल्पग्रस्तांना याव्दारे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी केली.
ड्रोनवर अंमल न केल्यास व चिंचोली प्रकल्प बारगळल्यास तीव्र आदांलन
वणी, वणी नाॅर्थ व अन्य क्षेत्रातील कोळसा खाणींमधील वाढत्या चोÚया, कोळशाची अवैध वाहतूक, हेराफेरी व गुन्हेगारी पाहता प्रत्येक खाणीमध्ये ड्रोन व्दारा निगराणी ठेवण्याच्या वारंवार सुचना करूनही वेकोलि प्रबंधन ड्रोन वापराबाबत गंभीर नाही त्यामुळे या सर्व अवैध प्रकारास वेकोलि प्रबंधन जबाबदार आहे असा आरोप करीत चिंचोली प्रकल्प बारगळल्यास प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी व वरील प्रश्नी तिव्र आंदोलन करू अशी चतावणी दिली.
याबाबत सकारात्मक कारवाईचे वरीष्ठांनी संकेत दिले. सास्ती, माथरा व पोवनी येथील उर्वरीत जमीनीचे अधिग्रहण व पोवनीचे पुनर्वसन संबंधात बैठकीत चर्चा झाली. या संदर्भात योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन अध्यक्ष प्रबंध निदेशकांनी दिले. सदर बैठकीस चिंचोली, धापटाळा, एकोणा, शिवनी या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *