लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,
ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन केले प्रमुखअतिथी म्हणून राजुरा विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री संपत खलाटे, नायब तहसीलदार श्री चिडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय गाठे, रुग्ण कल्याण समिती चे सदस्य सतीश बेतावार, नगरसेवक विक्रम येरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व फित कापून उदघाटन करण्यात आले। त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी विविध आजाराचे संबंधित वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुने रुग्णांची तपासणी करून उपचार केले. विविध प्रकारचे आजार टाळण्यासाठी जनजागृती करणाऱ्या फलकाचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
या वेळी प्रास्ताविक भाषणातून डॉ संजय गाठे यांनी आरोग्य मेळावा आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली,उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी आपल्या भाषणातून ” आरोग्यम धनसंपदा” कशी आहे याचे महत्त्व पटवून दिले,तर आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यास डॉक्टरांनी शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत व चांगली सेवा द्यावी असे प्रतिपादन केले. या प्रसंगी रुग्णांना सी एस सी केंद्र चालक उद्धव पुरी यांचे माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड व हेल्थ कार्ड ची नोंदणी करून सर्वप्रथम दिव्यांग रुग्ण वारलू साठवणे यांस गोल्डन कार्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावंगी येथील विशेष तज्ज्ञाच्या चम्मूसह डॉ नामपल्ले,डॉ,हिरादेवे,डॉ कमलेश घाटे,डॉ प्रशांत गेडाम,डॉ प्रवीण येरमे, कॉमन सर्विस सेन्टर चे संचालक उद्धव पुरी,विनोद खंडाळे, सतीश बेतावार, गुलाब राठोड, आरोग्यमित्र आशिष जेणेकर,आसमा पठाण, सर्व आरोग्य सेवक सेविका, शरद पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा डॉ शरद बेलोरकर व विद्यार्थी, व विविध वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे संचालन रवी ताकसांडे यांनी केले तर आभार श्री रमेश राठोड यांनी मानले.
कार्यक्रमाला परिसरातील रुग्णांनी मोठया संख्येत हजेरी लावून लाभ घेतला.