लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात
पंचायतराज दिना निमित्त आज दिनांक 24 एफ्रिल 2022 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतला दिलेले आहेत. आम्हाला जल जीवन मिशन अंमलबावणी सहाय्य संस्था प्रतिनिधी म्हणून बोरगाव बू. येथे उपस्थित राहता आले व ग्रामस्था सोबत विविध शासनाच्या योजना आणि जल जिवन मिशन या पेयजल योजनेवर चर्चा करता आली.
आजचा हा दिन माझी पंतप्रधान व अर्थतज्ञ श्री. मनमोहन सिंग यांनी 2010 मध्ये घोषित केला होता. पंचायतराज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कायदा करण्याचे काम इंग्रज अधिकारी लॉर्ड रिपन यांनी सन 1884 मध्ये केले होते. भारत स्वातंत्र्यानंतर 2 ऑक्टोंबर 1959 रोजी पंडीत नेहरू यांनी घोषणा केली. पुढे यामध्ये बदल होत गेले अनेक समित्या नेमण्यात आल्या व त्यांच्या सूचनेनुसार पंचायतराज सक्षम करण्याचे काम झाले. गावचा कारभार हा गावाने हाकला पाहिजे हा मूळ उद्देश या पंचायत राज संकल्पनेचा आहे. जसे आपल्या कुटुंबाचा कारभार कुटुंबातील हुशार व्यक्ती हाकाते त्याप्रमाणे गावं कारभारी गावातील असतील व त्यास मदत शासनाचे कर्मचारी करतील. म्हणून गावकारभारी हुशार, धडाडीचे, तत्पर आणि सामाजिक बांधिलकी असणारे व अभ्यासू असायला पाहिजेत.
आज बोरगाव बू. या गावात ग्रामसभेत उपस्थित झालो असता एक खूप छान अनुभव आला. ग्रामसभा म्हटले की, बऱ्याच ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना नको असते पण यालट या गावात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक लोकांना बोलवून आणून बसवत होते. लोकांना प्रश्न विचारा म्हणून प्रोत्साहित करीत होते. अशी गावं आदर्श बनण्यास उशीर लागणार नाही.