लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. येथे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आहे. येथील उद्योग मागील अनेक दशके लोटून देखील इथला प्रकल्पग्रस्त बेरोजगार आहेत. त्यामुळे आता कोणताही उद्योग चंद्रपूरला आला तर आधी नोकरी नंतर उद्योग अशा प्रकारे नियमावली बनविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी प्रभारी निवासी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना केल्या आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात कोळसा खाणीच्या भूसंपादनाशी निगडित बाबीसाठी समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध वेकोलि क्षेत्रातील विविध प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी सूचना केल्यात.
याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, भूसंपादन तथा निवासी जिल्हाधिकारी विशाल मेश्राम, प्रमोद कुमार वेकोलि माजरी, उपविभागीय अधिकारी वरोरा शिंदे, उपविभागीय अधिकारी राजुरा खलाटे, जिल्ह्यातील चार वेकोलि क्षेत्राचे प्रतिनिधी व इतर उद्योगाचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी याप्रसंगी महत्वाच्या प्रश्नावर सूचना केली, त्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकल्पग्रस्तांचे नोकरीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. त्यात जे प्रश्न न्यायप्रविष्ट आहे किंवा काही कारणाने तांत्रिकदृष्ट्या अडलेले आहेत, अशी प्रकरणे तसेच ठेवत उर्वरित प्रकरणे तात्काळ निकाली काढून त्यांना तात्काळ नोकरी देण्याची कारवाई करण्याची लोकहितकारी मागणी त्यांनी केली. त्यासोबतच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. परंतु स्थानिकांना डावलून उद्योगात परप्रातीय लोक नोकरीवर आहे. हि बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्य लोकप्रतिनिधींनी देखील आपली मते व्यक्त केली.