लोकदर्शन 👉 संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
२३ एप्रिल रोजी जगभरात ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी २४ एप्रिलला ‘इंग्रजी भाषा दिन’ पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाची ६ भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांसाठी दरवर्षी एक दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत – फ्रेंच (२० मार्च), चीनी (२० एप्रिल), इंग्रजी (२३ एप्रिल), स्पॅनिश (२३ एप्रिल), रशियन (६ जून), अरबी (१८ डिसेंबर).
२३ एप्रिल १६१६ रोजी प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर शेक्सपियर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी २०१० साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने या दिनाची स्थापना केली.
इंग्लिश ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या जर्मानिक गटाची भाषा आहे. मराठीत या भाषेला ‘इंग्रजी’ हे नाव असून ते पोर्तुगीज मधून घेतलेले आहे.
इंग्लिश ही मुळात इंग्लंडची भाषा आहे. नंतर ती इंग्रजांच्या वसाहतींत व त्यांच्या स्वामित्वा खालील प्रदेशांत पसरली. आज ती इंग्लंड बाहेर आयर्लंड, अमेरिका, कॅनडा, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, ऱ्होडेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, भारत, पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश, श्रीलंका त्याच प्रमाणे जगाच्या इतर काही भागांत बोलली जाते. अरुणाचल व नागालँड या भारतीय राज्यांची ती राजभाषा आहे.
पहिल्या महायुद्धा नंतर जागतिक व्यवहारातील फ्रेंचचे महत्त्व कमी होऊन ते इंग्लिशकडे गेले. दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या अमेरिकन वर्चस्वामुळे ते पुष्कळच वाढले आहे.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट