लोकदर्शन👉संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
जागतिक पुस्तक दिन इंग्रजी साहित्यातील एक *महान साहित्यीक शेक्सपियर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आज या साहित्यकाराची जयंती आणी पुण्यस्मरण दिवस सुध्दा आहे.*
आज पुस्तकाचे विश्व खुप मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. ऑडियो बूक, ई बुक्स किंवा पारंपारिक छापील पुस्तके आदी प्रकारात सध्या पुस्तके वाचायला उपल्बध आहेत.
पुर्वी न चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयावर सध्या पूस्तके निघत आहेत. मराठीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास नॉनफिक्शन (मराठीत ज्याला ललीत साहित्य म्हणतात), पुस्तकांचे विश्व फिक्शन (मराठीत ज्याला वाङमय साहित्य म्हणतात), पुस्तकांपेक्षा अधिक प्रमाणात विस्तारत आहे.
मराठीत ऑडियो बुक हा प्रकार अजून तरी फारसा प्रचलीत नाही असे माझे निरीक्षण आहे. माझे निरीक्षण परीपूर्ण असेलच असे नाही त्याच प्रमाणे ईबुक हा प्रकार सुध्दा मराठीत स्थिरावतो आहे.
पुस्तकांचे विश्व खरोखरच अनभूत आहे. त्यातील मजा औरच आहे. अनेक प्रसिध्द व्यक्तीनी त्याचा वाटचालीत पुस्तकांचे महत्व सांगितलेलेच आहे.
जागतिक पुस्तक दिनाचा सर्वाना शुभेच्छा !
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट