लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन,आवारपूर, महिला सक्षमीकरण तसेच महिलांना रोजगार मिळण्याकरीता विविध उपक्रम राबवीत आहेत.
त्यातीलच एक भाग म्हणून अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाउंडेशन आवारपुर च्या वतीने डीसेंबर, २०२१ ते मार्च, २०२२ पर्यंत सौंदर्य प्रसाधन प्रशिक्षण तीन महीण्याकरीता सभोवतालच्या गावातील एकूण २३ महिलांकरीता राबविण्यात आले यामध्ये आवारपूर, बिबी, नांदा, नोकारी व पालगांव या गावातील महिलांचा सहभाग होता. या प्रशिक्षणाचा फायदा महिलांना स्वतः चे सौंदर्य प्रसाधन केंद्र सुरु करण्यास होणार आहेत. मोठ्या सौंदर्य प्रसाधन केंद्रात प्रशीक्षक म्हणून काम करण्यास तसेच गावपातळीवर स्वतः चे घरघुती उद्योग सुरू करण्याकरिता होईल.
सर्व महिलांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण पुर्ण केले. या प्रशिक्षणाची सांगता करत असताना सी.एस.आर.ने सर्व यशस्वी महिलांना प्रमाणपत्र प्रदान केले. या कार्यक्रमाला अल्ट्राटेक चे युनिट हेड श्रीराम पी एस, तसेच विपुल घायवाटे, सी.एस.आर. प्रमूख सतीश मिश्रा, किरण करमणकर, सचिन गोवारदीपे, देविदास मांदाळे व अंजली बंडीबार यांची उपस्थिति होती.
या कार्यक्रमाच्या वेळी यूनिट हेड श्रीराम पी एस यांनी सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केलेत व सांगितले की, आम्ही नेहमी महिला सक्षमीकरणाकरीता कार्य करू.
रितु पुनवटकर या विद्यार्थ्यीनीने सी.एस.आर. चे आभार मानत आपला अनुभव सर्वांसमोर मांडला.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांचे मोलाचे सहकार्य होते.
,