लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕पत्रातून केली गोंडवाना यंग टिचर्सच्या कार्याची प्रशंसा*
राजुरा :- -गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स अससोसिएशन ने 11 एप्रिल 2022 ला विध्यापिठ परिक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयात शारीरिक शिक्षण आणि ग्रंथालायशास्त्र विषयाकरिता संशोधन केंद्र उपलब्ध करून घ्यावे या संदर्भात मा.कुलगुरू महोदयांना निवेदन देऊन मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सदर मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपरोक्त विषय आगामी होणाऱ्या विध्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेत सादर करणारा असल्याची माहिती 19 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या पत्रातून संघटनेला कळविली आहे.
गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स अससोसिएशन ने या संदर्भात उपरोक्त विषयासाठी संशोधन केंद्राची गरज असल्याचे माननीय कुलगुरूंना पटवून दिले.गोंडवाना विध्यापिठ परिक्षेत्रात शारीरिक शिक्षण व ग्रंथालायशास्त्र विषयातील प्राध्यापकांची संख्या व संशोधाक मार्गदर्शकांची एकूण संख्या लक्षांत घेता उपरोक्त विषयांसाठी संशोधन केंद्र अत्यल्प असल्याचे व संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे कुलगुरूंच्या लक्षांत आणून दिले आहे.
गोंडवाना विध्यापिठ परिक्षेत्रातील विविध संसाधने,संस्कृती, ज्ञानवर्धन स्रोत,क्रीडा संवर्धन,आणि ऐतिहासिक मूल्यता लक्षात घेता सदर विषयासाठी संशोधन केंद्र आवशक असल्याचे कुलगुरूंच्या भेटीत संघटनेने प्रतिपादित केले या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी अत्यंत चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
कुलगुरूंनी पाठविलेल्या पत्रात गोंडवाना यंग टीचर्स च्या शैक्षणिक व विध्यापिठ विकासाच्या योगदानाच्या कार्याची प्रशंसा केली असून भविष्यातही संघटनेने विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे असे पत्रातून अधोरेखित केले आहे.यावेळी कुलगुरूंच्या भेटीमध्ये गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे डॉ.संजय गोरे,सचिव डॉ. विवेक गोरलावार, डॉ,राजेंद्र गोरे,डॉ.राजू किरमिरे,डॉ. अभय लाकडे, डॉ. प्रमोद बोधाने, डॉ. कैलास भांडारकर,सिनेट सदस्य डॉ. प्रगती नरखेडकर प्रा. संजय राऊत,डॉ. शर्मा इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने कुलगुरू च्या दालनात उपस्थित होते