लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
पराकोटीच्या मनुवादी डोंगराएवढ्या गुलामी व्यवस्थेला एकट्या बाबासाहेबांनी धडक देऊन संविधानाचे राज्य निर्माण केले. आताही धर्म आणि जातीच्या आधारावर अराजकता निर्माण करणाऱ्या बेबंदशाही आणि दडपशाहीला नियंत्रित करण्यासाठी बाबासाहेबांच्याच विचारांची अत्यंत आवश्यक गरज आहे. ही ताकद केवळ बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्ष संघटनेत आहे आणि रिपब्लिकन पक्षच यांवर एकमेव उपाय योजना असून धर्म आणि जातीच्या आधारावर अराजकता निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच नियंत्रित करु शकते. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन देशभर फिरून रिपब्लिकन जागृती करुन देश पातळीवर पुर्ण ताकदीने रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित १४ एप्रिल ला- तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या रिपब्लिकन परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मातृसंघटनेचे प्रचारक आणि अभ्यासक आदरणीय भंते प्रज्ञापाल थेरो हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे, (गडचांदूर, ) आणि कॅप्टन बाजीराव सोनवणे, (समता सैनिक दल, औरंगाबाद )हे होते.
जागृती परिषदेत , आज देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आवश्यकता का आहे ? हा विषय ठेवण्यात आला होता.
सदर प्रसंगी प्रमुख वक्ते बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी बाबासाहेबांच्या मातृसंघटनेच्या माध्यमातून एकसंघ एकजुट संघटनशक्ती निर्माण करायची असेल तर सर्वात सोपा आणि सरळ उपाय योजना बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संविधानातील निवडणूक कार्यप्रणालीने आपले पदाधिकारी व अध्यक्ष दर चार वर्षांकरिता निवडून देणे हाच आहे. या पदाधिकारी निर्वाचन प्रणालीचा अवलंब केल्यास प्रत्येक सर्व सामान्य कार्यकर्त्यांना समानता आणि न्याय देता येतो आणि प्रत्येक अनुयायी, कार्यकर्त्यांना हा माझाच पक्ष ही भावना दृढमूल होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच ही न्यायीक प्रक्रिया असल्याने कोणताही कार्यकर्ता पक्ष, संघटना सोडून जाणार नाही आणि गेलाच तर त्याला समाजच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विलास पगारे यांनी,केले, संचालन राज्य संघटक वैभव धबडगे आणि आभार कार्यक्रमांचे आयोजक दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाचे राज्य कार्याध्यक्ष तथा मातृसंघटना प्रचारक दिनेश हनुमंते यांनी मानले.
सदर कार्यक्रमांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाचे प्रमुख पदाधिकारी व मातृसंघटनेचे प्रचारक उपस्थित होते.